आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिन:शिरपूर शहरात विद्यार्थ्यांनी उभारली शिवस्वराज्य गुढी

शिरपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल आयएमआरडी परिसंस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककातर्फे हा कार्यक्रम झाला. या वेळी पोवाडा सादर करण्यात आला. तसेच शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली.

अध्यक्षस्थानी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील होत्या. कार्यक्रमात जयेश पाटील या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. निवेदिता पवारने किल्ले रायगडची माहिती दिली. हिमानी पाटीलने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील चरित्रातील एका पाठाचे अभिवाचन केले. प्रा. विजय गर्गे यांनी शिवस्वराज्य दिनाचे विशेष महत्त्व स्पष्ट केले. महाराष्ट्र गीताचे सादरीकरण खुशबू सिंग, मेघा गुरव, लक्ष्मी येशीराव, निवेदिता पवार यांनी केले. हर्षदा सोनवणेने सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.छाया पाटील, समिती सदस्य प्रा. विवेक चव्हाण, प्रा. सूरज निकम, प्रा. मिलिंद पाटील, दीपक दोरिक आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...