आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण:दास नवमीनिमित्त होणार‎ श्लोक पठण, पारायण‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्कार्याेत्तेजक सभा व समर्थ‎ वाग्देवता मंदिरातर्फे दास‎ नवमीनिमित्त ६ ते १५ फेब्रुवारी‎ दरम्यान विविध कार्यक्रम होणार‎ आहेत. नियोजनानुसार समर्थ‎ वाग्देवता मंदिरात मनाचे श्लोक‎ पठण, राम रक्षा पठण दुपारी ३ ते ४‎ व दासबोधाचे चक्री पारायण होणार‎ आहे.‎ त्याचबरोबर ६ ते १० फेब्रुवारी‎ दरम्यान दुपारी ४ ते ५ समर्थ‎ वाग्देवता मंदिरात भजन होणार‎ आहे. याशिवाय ११ फेब्रुवारीला‎ सत्कार्याेत्तेजक सभेच्या देव‎ सभागृहात स्व. जा. र. देशपांडे‎ मुक्तद्वार वाचनालयाचा वार्षिक‎ पारितोषिक वितरण समारंभ दुपारी ४‎ वाजता होणार आहे.

त्यानंतर १२‎ फेब्रुवारीला वाग्देवता मंदिर येथे‎ गाेंदवलेकर महाराज परिवारातर्फे‎ सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत‎ उपासना, १३ फेब्रुवारीला दुपारी‎ साडेचार वाजता देव सभागृहात‎ प्रवचन होणार आहे. त्यानंतर १५‎ फेब्रुवारीला सकाळी सात वाजता‎ नारायण बुवा समाधी मंदिरापासून ते‎ समर्थ वाग्देवता मंदिरापर्यंत‎ प्रभातफेरी, सकाळी अकरा वाजता‎ समर्थांच्या पादुकांचे पूजन व‎ दासबोध पारायणाची समाप्ती होणार‎ आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे ‎,‎ असे आवाहन सत्कार्याेत्तेजक‎ सभेचे अध्यक्ष प्रा. वि. वि.‎ नकाणेकर, चिटणीस प्रा. सतीश‎ दीक्षित, समर्थ वाग्देवता मंदिराचे‎ अध्यक्ष अ. भा. चितळे, कार्याध्यक्ष‎ प्रा. दे. दि. डोंगरे यांच्यासह‎ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...