आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य जळाले:शहादा येथील दुकानाला आग; 15 हजारांचे साहित्य जळाले

शहादा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वृंदावननगर जवळ असलेल्या निर्मल मत्स्यालयाच्या दुकानाला दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजता अचानक आग लागल्याने धावपळ उडाली होती. परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्वरित आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. या आगीत सुमारे १५ हजारांचे साहित्य जळून खाक झाले आहे. वृंदावननगर जवळ श्री महाराणा प्रतापसिंह चौक ते पटेल रेसिडेन्सी मुख्य रस्त्यावर निर्मळ मत्स्यालयाचे दुकान आहे. शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने दुकानातील साहित्य जळायला लागले. त्यात फर्निचर देखील जळाले. साधारणत: पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तवला आहे. शेजारील नागरिकांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. त्यांनी आपापल्या घरातून पाणी आणून आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने दुकानाच्या आजूबाजूला दोन दुकाने होती. ते वाचले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...