आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कर भरला नसल्याने दुकान, टॉवर सील‎

धुळे‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मालमत्ता कर‎ वसुली विभागाने कर न भरणाऱ्यांवर‎ कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार‎ सोमवारी दोन मोबाइल टॉवर व एक‎ दुकान सील करण्यात आले.‎ महापालिकेतर्फे मार्च महिन्याच्या‎ पार्श्वभूमीवर मालमत्ता कर‎ वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात‎ आले आहे. जास्तीत जास्त कर‎ वसूल व्हावा यासाठी शास्ती माफ‎ करण्यात आली. या योजनेचा‎ अनेकांनी लाभ घेतला.

पण‎ अद्यापही अनेक मालमत्ताधारकांनी‎ कर भरलेला नाही. त्यामुळे आता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महापालिकेने थकबाकीदारांवर‎ कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार‎ साक्री रोडवरील चंपाबाग‎ परिसरातील एका थकबाकीदाराकडे‎ १ लाख २३ हजार रुपये थकल्याने‎ दुकान सील करण्यात आले. तसेच‎ जयहिंद कॉलनीत मोबाइल‎ टॉवरच्या करापोटी व्हीजन‎ कंपनीकडे ३ लाख १५ हजार ५०८‎ रुपये थकल्याने हा टॉवर सील‎ केला. स्टेशन रोडवरील एटीसी‎ मोबाइल टॉवर कंपनीकडे ५ लाख‎ १९ हजार ४९६ रुपयांची थकबाकी‎ होती. त्यामुळे हा टॉवरही सील‎ करण्यात आला. वसुली अधीक्षक‎ शिरीष जाधव, मुकुंद अग्रवाल,‎ मनोज चिलंदे, अजय देवरे, अशोक‎ चौधरी आदींनी कारवाई केली.‎

बातम्या आणखी आहेत...