आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:पोस्टल ऑर्डरचा तुटवडा; उमेदवारांची होते गैरसोय, अर्ज भरण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य राखीव पोलिस दलात सफाईगार आणि भोजन सेवकांची भरती करण्यासाठी अर्ज भरले जात आहे. या अर्जासोबत पोस्टल ऑर्डर जोडावी लागणार आहे. दुसरीकडे टपाल कार्यालयात पोस्टल ऑर्डर व डिमांड ड्राफ्टचा तुटवडा निर्माण झाला आहे. टपाल विभागाने नियोजन न केल्यामुळे तरुणांना भरउन्हात रांगेत उभे राहावे लागते आहे. अर्ज भरण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस आहे.

धुळे राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ६ मध्ये सफाईगार व भोजनसेवक पदांसाठी इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी गर्दी होते आहे. अर्जासोबत पोस्टल ऑर्डर जोडणे बंधनकारक आहे; परंतु मुख्य टपाल कार्यालयात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरासोबत ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणांना भर उन्हात पोस्टल ऑर्डरसाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. याविषयीची माहिती मिळाल्यावर विधी शाखेचे विद्यार्थी मयूर खरात, दीपक खैरनार यांनी टपाल कार्यालयात जात अर्ज करण्यासाठी आलेले दीपक सूर्यवंशी, महेश बाविस्कर, हर्षल पाटील, मुकेश पाटील, चेतन पाटील, जितेंद्र महाजन, शुभम कोल्हे यांच्याशी संवाद साधला. तसेच टपाल विभागाचे अधीक्षक सोनवणे यांची भेट घेतली. त्यांनी उद्या सोमवारपर्यंत पोस्टल ऑर्डर उपलब्ध करून देण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...