आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा गिअर:शोरूममधील तिजोरी घेऊन चोरटे पळाले, दुसऱ्या शोरूममध्येही चोरटे शिरले पण रिकाम्या हातानेच परतले

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात पुन्हा एकदा चाेरटयांनी डोके वार काढले आहे. बुधवारची रात्री चोरटयांनी सेवा ऑटोमोटिव्हस शोरुमधून तीन लाखांची रोकड असलेली तिजोरी लांबवली. तीन चोरटयांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही चोरी केली. तर अन्य एका शोरुमध्ये ही चोरीचा प्रयत्न झाला. तर साक्री रोडवरील एका घरात ही चाेरटयांनी हात साफ केला. या प्रकरणी मोहाडी पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धुळे शहर पोलिस ठण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जवाहर नगरात बंद घर फोडले

एकीकडे मोहाडी पोलिस ठाण्यात शोरुमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतांना साक्री रोडवरील जवाहर नगरात देखील चोरीचा प्रकार समोर आला. या कॉलनीत राहाणारे रावसाहेब देवरे यांच्या बंद घराची फळी तोडून चोरटयांनी आत प्रवेश केल्याचे पुढे आले. घटनेनंतर धुळे शहर पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले. परंतु घरमालक पुणे येथे राहत असल्यामुळे या शोरुममधील तिजोरी घेऊन चोरटे पळाले. घरातून नेमका किती किंमतीचा ऐवज चोरीस गेला हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे धुळे शहर पेालिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर शोरुमधील चोरी प्रकरणी भिला हिलाल पाटील यांच्या तक्रारीवरुन मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या शोरुमध्ये चोरटे शिरले, रिकाम्या हाती परतले : चोरटे एवढयावरच थांबले नाही. तर त्यांनी जवळच असलेल्या अन्य एका शोरुमला देखील लक्ष्य केले. परंतु या ठिकाणी मात्र चोरटयांना यश आले नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. बुधवारी सकाळी हा प्रकार समाेर आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांचे पथक दाखल झाले. याशिवाय ठसे तज्ञ व श्वान पथकाला देखील बोलविण्यात आले. श्वान याने काही अंतरापर्यत चोरटयांचा माग काढला.

१० मिनिटांत हातसफाई
मध्यरात्री समारे २ वाजून ३६ मिनिटांनी चोरटे आले. यानंतर अवघ्या १० मिनीटात तिजोरीसह ते पसार झाले. महामार्गाजवळ त्यांनी वाहन आधीच उभे केले होते.

लाकडी कपाटात तिजोरी
व्यवहरातील रोकड तिजाेरीत ठेवली होती. सकाळी बँकेत तिचा भरणा करण्यात येणार होता. लाकडी कपाटात ही लोखंडी तिजोरी होती. कपाट लाकडी असल्यामुळे ते सहज उघडले. यानंतर तिजाेरी लांबविणे चोरटयांनी कठीण झाले नाही.

चोरट्यांनी याच शोरूममधून तिजोरी पळवली आहे.

सकाळी पोलिस मुख्यालयातून जॅक या श्वानाला आणले. चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तंूचा त्याला गंध दिला. जॅक ने तिजोरी असलेली कॅबिन तसेच मागील काही परिसर दर्शविल्यानंतर महामार्गापर्यंत माग दाखवला.

देवपुरातही दुचाकीची चोरी
देवपुरातील एका खासगी रुग्णालयाजवळून दुचाकी(एम. एच. १८, ए. आर.५१७०) लांबवली. वाहन मालक शेख फरहान शेख शरीफ (वय २१, रा. वडजाई रोड) याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

चोरट्यांनी केली रेकी : सेवा ऑटोमोटिव्हच्या दरवाजाजवळील लॅश हा कमकुवत झाला होता. याची माहिती चोरटयांना असावी. त्याकरीता शोरुममध्ये येऊन त्यांनी रेकी अर्थात पाहणी केली असावी. यानंतरच तिघे त्या मार्गाने आत शिरले. अशी माहिती पोलिसांनी दिली.

मारुती सेवा ऑटो मोटिव्हजमध्ये तीन चोरटे शिरले
अवधान शिवारात मारुती सेवा ऑटो मोटिव्हज आहे. या ठिकाणी नेहमी प्रमाणे रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी गस्तीवर होते. यावेळी त्यांची नजर चोरून चाेरटयांनी मागील बाजूने आवारात प्रवेश केला. यानंतर काचेच्या दरवाजाचे खालील बाजूस असलेले लॅश तोडून तिघे चोरटे आत शिरले. तसेच शोध घेत चोरटे तिजोरी असलेल्या कॅबिनपर्यंत पोहचले. यानंतर रोकड असलेली लोखंडी तिजोरी घेऊन चोरटे पसार झाले. या तिजोरीत सुमारे ३ लाख ६ हजार ७८६ रुपये होते. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीने टिपला आहे.

सीसीटिव्ही फुटेजवरुन चोरटयांचा शोध सुरू आहे. त्यासाठी रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगार ही तपासले जात आहे. तिघा चोरटयांच्या शरीरयष्टी अन देहबोलीवरुन त्यांचा अंदाज लावण्यात येतो आहे. तर पथक तपासासाठी पाठविले आहे. -दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...