आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिकलसेल तपासणी:दक्षिणमुखी हनुमान मंडळातर्फे सिकलसेल तपासणी शिबिर

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोनगीर येथील दक्षिणमुखी हनुमान गणेश मित्र मंडळातर्फे गावातील एन.जी. बागूल हायस्कूलमधील विद्यार्थिनींची सिकलसेल तपासणी करण्यासाठी शिबिर झाले. या शिबिरात २०० जणांची तपासणी झाली. त्यातून पाच विद्यार्थ्यांना सिकलसेलची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेणार आहे.

सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय माळी यांनी तपासणी केली. दौलत मोरे आणि विलास वारुडे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. उदयसिंग परदेशी, दिगंबरसिंग परदेशी, निखिलसिंग परदेशी, पंकज परदेशी, सूरजसिंग परदेशी, धर्मेंद्रसिंग परदेशी, शेखर पावनकर, सुमीत परदेशी, ध्रुव परदेशी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक बी.एच. माळी, व्ही.एस. सोनार, जे.पी. पारधी, एन.बी. चौहान, एम.आर. रोकडे, यशवंत धनगर, प्रभुदास मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...