आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपासून सोन्या, चांदीच्या दरात वाढ हाेत असून, गेल्या चार दिवसांत चांदी किलोमागे दीड ते २ हजार रुपयांनी महागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दरवाढ झाली आहे. सद्य:स्थितीत चांदीची ६६ हजार रुपये प्रतिकिलोने विक्री होते आहे. जानेवारीपर्यंत चांदीच्या दराचा आलेख उंचावलेला असेल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सोन्याचे भाव प्रतितोळा ५४ हजारांवर गेले आहे.
लग्नसराईमुळे काही दिवसांपासून सराफ बाजारात उलाढाल वाढली आहे. दुसरीकडे गेल्या महिन्यापर्यंत स्थिर असलेले चांदीचे भाव आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले असल्याचे चित्र आहे. चांदी १२ डिसेंबरला ६५ हजार रुपये किलो होती. त्यानंतर दरात सातत्याने वाढत होत असून १३ डिसेंबरला ६६ हजार ५०० रुपये किलो तर मंगळवारी ६७ हजार रुपये किलोवर गेली होती.
गेल्या चार ते पाच दिवसांत चांदीच्या दरात किलोमागे दीड ते दोन हजार रुपये वाढ झाली आहे. अनेक जण चांदीच्या देवी-देवतांचा मूर्ती, देवपूजेच्या वस्तू, पैंजण, बालकांसाठी वाळे, चेन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे. युरोपियन देशात चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले असून, शेअर बाजारात चढउतार होत असल्याने चांदीचे दर वाढतात आहे.
सोने ५४ हजारांवर कायम, ३०० रुपये वाढ
सोने मंगळवारी प्रतितोळा ५४ हजार ७०० होते. सोन्याच्या दरात काही दिवसांपासून दोनशे ते तीनशे रुपये वाढतात किवा कमी होतात. बुधवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा १०० रुपये वाढ होऊन दर ५४ हजार ८०० रुपयांवर गेले होते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने ५४ हजारांवर गेले आहे.
जानेवारीपर्यंत दर चढेच राहणार
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात अस्थिर स्थिती आहे. तसेच चांदीचा औद्योगिकीकरणासाठी वाढत असलेला वापर व युरोपीय देशात नाताळनिमित्त हाेत असलेल्या खरेदीमुळे चांदीच्या दरात वाढ होते आहे. जानेवारीत दर कमी होण्याची शक्यता आहे.- अजय नाशिककर, उपाध्यक्ष: सराफ असोसिएशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.