आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:रक्ताची टंचाई असल्याने गावोगावी रक्तदान शिबिर घेत बांधिलकी जपा

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून जिल्ह्यात रक्ताची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी गावोगावी रक्तदान शिबिर घेण्यात यावी, असे आवाहन प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

धुळे तालुक्यातील दोंदवाड येथे इंद्रायणी फाउंडेशनतर्फे दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भदाणे यांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी नागरिकांनी निःसंकोचपणे पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी इंद्रायणी फाउंडेशचे अध्यक्ष रवींद्र बिराडे यांनी संस्थेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भदाणे, दत्तात्रय माळी, पंचायत समिती सदस्य देवेंद्र माळी, बाबाजी देसले, डॉ. संदीप पाटील, भूषण गुरव, जितेंद्र जैन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...