आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:सिंधूरत्नज शाळेत भाषासंवर्धन प्रश्नमंजूषा‎ स्पर्धा, विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिंधूरत्नज एस. व्ही. सी. (महात्माजी )‎ इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थी कुणाल मनाेहर साळंुखे,‎ कावेरी अानंद ढवळे, केतकी सचिन पाटील यांच्या संघाने‎ जिल्हा मराठी भाषा समिती, शिक्षणाधिकारी कार्यालय व‎ विद्यावर्धिनी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या‎ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या काळात घेण्यात अालेल्या‎ प्रश्नमंजूषा स्पर्धेतील अंतिम फेरीत द्वितीय क्रमांकाचे‎ पारिताेषिक प्राप्त केले.

त्यांना शिक्षणाधिकारी माेहन देसले‎ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गाैरवण्यात अाले. याप्रसंगी‎ शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता धिवरे, वासंती पवार,‎ विविध शाळांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, मान्यवर उपस्थित हाेते.‎ शाळेतर्फे वैशाली पाटील व मीनल साेनवणे यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अनेकांकडून काैतुक‎ करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...