आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिय्या:गटारीतील पाण्यासह ठिय्या आंदोलन

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विश्वकर्मा नगरात गटारीचे काम करावे यासाठी मनपा प्रशासनाला ६ एप्रिल निवेदन दिले होते. हे काम करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मनपाने मागितला होता. पण केवळ प्राथमिक स्वरुपाचे काम झाले. त्यामुळे नागरिकांनी मंगळवारी पुन्हा आयुक्त देविदास टेकाळे यांच्या दालनाबाहेर गटारीच्या पाण्यासह ठिय्या आंदोलन केले.

प्रभाग क्रमांक ११ मधील विश्वकर्मा नगरातील गणपती मंदिराजवळ सांडपाणी वाहुन येते. त्यामुळे गटारीचे काम करावे, अशी मागणी सातत्याने होते आहे. मनपा प्रशासनाने काम करण्याचे आश्वासन दिले होते. या कामासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतुद करू असे पत्राने कळवले होते. एक महिन्याच्या कालावधीत फक्त एक छोटी कच्ची गटार खोदण्यात आली. त्यामुळे प्रश्न सुटलेला नाही. या कामासाठी निविदाही निघाली नाही. गटारीचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात रजनिश निंबाळकर, गाेपाल पाटील, सागर निकम, भटू पाटील, राहुल चौधरी, अजय मोरे आदी सहभागी झाले होते. या वेळी घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...