आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Six And A Half Lakh Worth Of Opium Powder Seized; A Car Coming From Madhya Pradesh Was Intercepted After Chasing Nagaon On The Mumbai Agra Highway| Marathi News

मुद्देमाल जप्त:साडेसहा लाखांच्या अफूच्या बोंडाचा चुरा जप्त; मुंबई-आग्रा महामार्गावर नगावला पाठलाग करून अडवली मध्यप्रदेशातून येणारी कार

धुळे/ सोनगीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास सोनगीर पोलिस ठाण्याच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून मध्य प्रदेशातून येणाऱ्या एका कारमधून सुमारे साडेसहा लाखांच्या अफूच्या सुकलेल्या बोंडाचा चुरा जप्त केला. या कारवाईत वाहनासह सुमारे ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर पोलिस गस्त घालत होते. त्या वेळी शिरपूरहून कार (क्र.एमपी-०४-सीके-९७८७) भरधाव वेगाने धुळ्याकडे जात होती. पोलिसांनी चालकाला कार थांबवण्याचा इशारा केला पण चालकाने कार भरधाव वेगात पुढे नेली. पोलिसांनी पाठलाग करून कार नगावजवळ अडवली. या वेळी चालकाने अंधारात पळ काढला.

कारमध्ये काळ्या रंगाच्या ६ प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये अफूच्या अर्धवट सुकवलेल्या बोंडाचा १२९ किलो चुरा मिळून आला. या कारवाईत सुमारे ६ गोण्यांमधून ६ लाख ४४ हजार ८०० रुपये किमतीची सुमारे १२८ किलो अफूची बोंड जप्त करण्यात आली. मोबाइल, कार व अफूच्या बाेंंडसह एकूण ९ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल संजय देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, संजय देवरे, सूरजकुमार साळवे, अजय सोनवणे, प्रवीण सोनवणे, विजयसिंग पाटील, राकेश ठाकूर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...