आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसरात मनाई आदेश लागू:साडेसहा हजार उमेदवार देणार एमपीएससी परीक्षा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब या पदासाठी ८ ऑक्टोबरला शहरातील १६ परीक्षा केंद्रात लेखी पूर्व परीक्षा होणार आहे. साडेसहा हजार उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले आहे. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू असेल.

शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल, जे.आर. सिटी हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, न्यू. सिटी हायस्कूल, अग्रसेन महाराज विद्यालय, विद्यावर्धिनी महाविद्यालय, कनोसा हायस्कूल, दुधेडिया हायस्कूल, नॅशनल उर्दू हायस्कूल, महाराणा प्रताप विद्यालय, महाजन हायस्कूल, एकवीरा देवी हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, एल.एम. सरदार उर्दू हायस्कूल, एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयात परीक्षा होणार आहे. एकूण ६ हजार ७२० उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

बातम्या आणखी आहेत...