आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेतर्फे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी देहबोली, कौशल्य विकास, ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, महिलांसाठी करण्यात आलेले कायदे आदींची माहिती देण्यात आली. कार्यशाळेत ७० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
प्राचार्य डॉ. मनोहर पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक डॉ. हसिम शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, उपप्राचार्य के. एम. बोरसे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आय.एस. अहिरराव, प्रा. डॉ. स्वाती बोरसे, प्रा. सायली नंदन उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मनोहर पाटील म्हणाले की, खरे व्यक्तिमत्त्व हे तुमचे दिसणे व कपड्यांवरून नव्हे तर बोलणे, देहबोली, कर्तृत्व व कौशल्य यावरून सिद्ध होते. अॅड. चैतन्य भंडारी यांनी सायबर सुरक्षेविषयी माहिती दिली. अॅड. मीनल क्षीरसागर यांनी विविध कायद्यांची माहिती दिली. दर्शना राजपूत, चारु लुल्ला, पायल गोंदवाणी, कीर्ती मराठे, समन्वयक प्रा. सपकाळे, सोनिया शर्मा, राजेश्वरी खंडलाय यांनी मनोगत व्यक्त केले. दिव्या साबळेने स्वागत गीत सदर केले. समन्वयक प्रा. डॉ. रूपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. ज्योती ढोले, प्रा. डॉ. अर्चना चौधरी यांनी परिचय करून दिला. प्रा. वैशाली पाटील यांनी आभार मानले. दरम्यान, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यानुसार ही कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.