आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जीपणा:ढिसाळपणा; पाणीपुरवठा पुन्हा गेला 7 दिवसांवर

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागात पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला होता. पण आता पुन्हा सात ते आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. त्यामुळे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येते आहे.

महापालिका निवडणुकीवेळी भाजपने शहरात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले होते. सत्ता मिळाल्यावर अद्यापही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. उलट एप्रिल व मे महिन्यात आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर आंदोलन झाली. मग महापालिका प्रशासनाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. त्यानुसार काही दिवसांपासून विविध भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला होता.

पण आत्ता पुन्हा देवपूर, नगावबारी, इंदिरा गार्डन परिसर, ऐशी फुटी रोड भागात सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो आहे. त्यातच भारनियमन होत असल्याने अडचणी वाढल्या आहे. दुसरीकडे उन्हाची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...