आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तळोदा:सापांचे मिलन कॅमेरात कैद, सापाची जोडी पाहण्यासठी जमली बघ्यांची गर्दी

तळोदा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा येथील रोकडमान हनुमान परिसरात सर्प मिलनाचे दृश्य कॅमेराबद्द झाले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सातपुडा म्हटला की डोळ्यासमोर उभा राहतो निसर्ग. निसर्गाची देणगी लाभलेल्या या परिसरात विविध प्रजातीच्या वनस्पती सोबतच पक्षी, फुल यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. यासोबतच वन्यजीव प्राण्यांबरोबर दुर्मिळ साप (सर्प) पाहायला मिळतात. हे सर्प मिलन तळोदा येथील रोकडमन हनुमान परिसरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणांच्या कॅमेऱ्यात टिपले गेले आहे.

सर्वसाधारणपणे जून हा मिलनाचा काळ असतो. याच कालावधीत सापांचे मिलनाचा हा योग दुर्मिळच म्हणावा लागेल. शनिवारी सायंकाळी रोकडमन हनुमान मंदिर परिसरात नागरिकांना हे अनोखे दृश्य पाहायला मिळाले. मिलनात बेभान झालेल्या सापाच्या जोडीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...