आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जा पंप:हमीभावाचा कायदा करण्यासह सौरऊर्जा पंप वितरण केले जावे

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा तातडीने करावा, राज्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना मागितल्यावर लगेच सौरऊर्जा पंप देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या धुळे शाखेतर्फे करण्यात आली आहे. याविषयी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय किसान सभा व महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी १ सप्टेंबरला मागणी दिवस पाळण्यात आला. त्यानिमित्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने हमी भावाचा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन पाळावे.

वीज बिल विधेयक सन २०२२ शेतकऱ्यांना लागू करू नये, संयुक्त किसान माेर्चाच्या आंदाेलन प्रसंगी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अतिक्रमित वनजमीन धारकांचे प्रलंबित दावे निकाली काढून त्यांना प्रमाणपत्र वाटप करावे, थकबाकीदार शेतकऱ्यांवर वसुलीचे दावे दाखल केले जात आहे. हा प्रकार बंद करावा, शेतकऱ्यांचे खाते गाेठवण्याचा निर्णय रद्द करावा, पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, शिरपूर, धुळे येथील सूतगिरणींनी कापूस खरेदी करावा, केळीला फळबाग योजनेंतर्गत अनुदान मिळावे, पेट्राेल व डिझेलचे भाव कमी करावे, अशी मागणी झाली. या वेळी किसान सभेचे हिरालाल परदेशी, हिरालाल सापे, वसंतराव पाटील, साहेबराव पाटील, पाेपटराव चाैधरी, मदन परदेशी, संताेष पाटील, भरत साेनार, रामचंद्र पावरा, डाॅ. किशाेर सूर्यवंशी, अरविंद पाटील, बापू गर्दे, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...