आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:धान्य गोदामात कार्यरत‎ कामगारांचे प्रश्न सोडवा‎

धुळे‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय धान्य गोदाम, शासकीय‎ वखार महामंडळासह धुळे व‎ नंदुरबार जिल्हा माथाडी, असंरक्षित‎ कामगार मंडळात निर्माण झालेल्या‎ समस्या सोडवाव्या, अशी मागणी‎ जिल्हा हमाल कामगार संघटनेने‎ केली आहे. त्यासाठी निवासी‎ उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड‎ यांना निवेदन देण्यात आले.‎ निवेदनात म्हटले आहे की,‎ जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाम,‎ वखार महामंडळ या ठिकाणी‎ माथाडी मंडळात नोंदणी झालेल्या‎ कामगारांनाच काम मिळाले पाहिजे.‎

त्यादृष्टीने उपाययोजना करावी. धुळे‎ व नंदुरबार जिल्हा माथाडी व‎ असंरक्षित कामगार मंडळाने‎ माथाडी कायदा लागू करावा, मोराणे‎ येथील प्रताप नाना महाले कांदा‎ खरेदी केंद्रात माथाडी मंडळात‎ नोंदणीकृत असलेल्या कामगारांना‎ काम द्यावे, अशी मागणी करण्यात‎ आली. या वेळी हेमंत मदाने, गंगाधर‎ कोळेकर, भागवत चितळकर,‎ गायत्री साळवे, लता सूर्यवंशी, डॅनी‎ चांदे आदी उपस्थित होते. जिल्हा‎ प्रशासनाने याविषयाकडे गांभीर्याने‎ लक्ष द्यावे, तसे झाले नाही तर‎ आगामी काळात आंदोलन करण्यात‎ येईल, असा इशारा प्रशासनाला‎ निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...