आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहीर ढासळली:ढिगाऱ्याखाली दबून आईसह मुलगा मृत्युमुखी; ही घटना धुळे तालुक्यातील मोरशेवडीत घडली

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम सुरू असलेल्या विहिरीचा काही भाग ढासळला. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून आईसह मुलाचा मृत्यू झाला. सुनीता भिका पवार (वय ३९) व श्याम भिका पवार (वय १०) असे मृतांचे नाव आहे. ही घटना धुळे तालुक्यातील मोरशेवडीत घडली.

मोरशेवडी येथील माहेर असलेल्या सुनीता भिका पवार या पती भिका छगन पवार व मुलगा श्याम भिका पवार यांच्यासह वडिलांकडे आल्या होत्या. सुनीता पवार यांचे वडील खिरा जामा जाधव यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. तेथे शुक्रवारी (दि.१३) दुपारी सुनीता पवार, भिका पवार व श्याम पवार हे गेले. विहिरीच्या कामाची पाहणी करताना अचानक विहिरीचा काही भाग कोसळला.

या वेळी भिका पवार यांना नागरिकांनी बाहेर काढले. पण सुनीता व श्याम मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. त्यानंतर जेसीबीने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले. पण विहिर खोल असल्याने पोकलेन यंत्र मागवले. तेही बंद पडले. अंधार झाल्याने मदतकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर रविवारी जळगाव येथून दुसरे पोकलेन आल्यानंतर मदतकार्य सुरू झाले. त्यानंतर काही वेळाने सुनीता पवार व श्याम पवार यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली चिखलात आढळला. धुळे तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...