आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रोते मंत्रमुग्ध:सोनगीरला बहुभाषिक कविसंमेलन रंगले;संत सावता ग्रुपतर्फे कविसंमेलनाचे आयोजन

सोनगीर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवलेखक साहित्य समूह व येथील संत सावता ग्रुप आयोजित बहुभाषिक कविसंमेलनात एका पेक्षा एक सरस व विविध विषयांवर कविता सादर झाल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. अध्यक्षस्थानी कवी दत्तात्रय कल्याणकर होते. गंगामाई महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शारदा मोरे यांचे हस्ते उद्घाटन झाले.बहुभाषिक कविसंमेलन येथील संत सावता व्यायाम शाळेच्या सभागृहात झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून विजयाताई पाटील (नवापूर), रुग्णमित्र दिलीप माळी, निवृत्त शिक्षक एल.बी. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य आरिफ खान पठाण, मोहन सैंदाणे, रवींद्र माळी, एम. टी. गुजर, रविराज माळी, अ‍ॅड. विनोद बोरसे, अर्जुन मराठे, हसन खान पठाण, दापुराचे सरपंच किशोर पाटील, राजू पाडवी संदीप गुजर, जितेंद्र बागुल होते. विक्की पाटील, मीना सैंदाणे, पंकज पगारे, झेंडू देवरे, कल्पना देवरे, गायत्री बोंढरे, जितू बहारे, वैशाली बोरसे, प्रतिभा शिंगाणे, शामल पाटील, सागर कोळी, मयूर राजपूत, ललित कुलकर्णी, महेंद्र पाटील, दिलीप पाटील, गणेश पाटील, बाळकृष्ण शिंदे, पूनम बेडसे, चंद्रवदन देवरे, विशाल जैन आदींनी कविता सादर केल्या. माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर पावनकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय माळी यांनी केले. चंद्रकांत बिरारी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...