आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रांझणीसह परिसरातील शेतात ज्वारीचे पीक जोमात; चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा‎

तळोदा ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील रांझणीसह ‎ परिसरात ज्वारी पिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच शेतकऱ्यांनी ‎ शेतामध्ये पिकवलेले ज्वारीचे पीक ‎ मोठ्या जोमात बहरले असून ज्वारी ‎पिकाची दाणेभरणी झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले ‎ ज्वारीचे पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण ‎ करण्यासाठी शेतकरी विविध ‎उपाययोजना करून ज्वारी पिकाचे संरक्षण करीत आहेत.रांझणीसह परिसरातील शेतकऱ्यांनी ‎ ज्वारीचे पीक घेतले असून, सध्या मोठ्या जोमात उभे असलेल्या या ‎पिकाच्या कणसांची पूर्ण वाढ झाली असून पक्ष्यांकडून ज्वारीचे नुकसान ‎ होत आहे. पक्षी ज्वारी कणसांतील ‎ दाणे खाण्यासाठी ज्वारीवर पिकावर ‎ताव मारत असल्याने पक्ष्यांपासून ‎आपल्या हातातोंडाशी आलेला घास ‎हिरावून घेतला जाऊ नये म्हणून ‎ शेतकरी ज्वारीच्या पिकामध्ये ‎ विविध उपाययोजना करीत आहेत. ‎ज्वारीच्या क्षेत्रात माणसाच्या ‎पुतळ्याचे आकाराचे बुजगावणे ‎ उभारले आहेत. तर काही ठिकाणी ‎पक्ष्यांना घाबरवण्यासाठी ज्वारीच्या झाडाला प्लास्टिकच्या पिशव्या ‎ किंवा मोठमोठ्या प्लास्टिकच्या ‎ पट्ट्या बांधत आहेत. त्यामुळे ‎ होणाऱ्या करकर आवाजाने पक्षी ‎ भीतीने पळून जात आहेत.

या ‎उपाययोजना करत असताना काही‎ शेतकरी हे शेतामध्ये उभे राहून‎ ज्वारी या पिकाची गोफणीच्या‎ सहाय्याने राखण करीत आहेत. तर‎ काही शेतकरी फटाके सुध्दा फोडत‎‎ आहेत. त्यामुळे ज्वारी धान्य ‎ कणसांचे पक्ष्यांपासून संरक्षण ‎ करण्यासाठी शेतकरी विविध युक्‍त्या ‎ वापरून ज्वारी पिकाचे संरक्षण ‎ करीत असल्याचे चित्र रांझणीसह‎ परिसरात पाहावयास मिळत आहे.‎ तर यंदा पावसामुळे ज्वारीचे उत्पन्न‎ चांगले येण्याची अपेक्षा शेतकरी‎ वर्गाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून‎ राखण केली जात आहे.‎‎.‎

बातम्या आणखी आहेत...