आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:75 मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करा; कृषी विभागाचे आवाहन

तऱ्हाडी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात यंदाही कपाशीची सर्वाधिक लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मका, तूर, ज्वारीकडे अनेक शेतकऱ्यांचा ओढा आहे. गेल्या वर्षी सोयाबीन, कांदा काढण्याच्या अवस्थेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे सोयाबीन व कांद्याची पेरणी कमी होण्याचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली. त्यामुळे आता कपाशीची रोप उगवण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी कमीत कमी ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तालुक्यात ९६ हजार ७६५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यंदाही कपाशीचा सर्वाधिक पेरा होण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, उडीद, मूग व इतर पिकांची पेरणी होईल. मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात हवामान खात्याने बऱ्यापैकी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धूळपेरणीला अनेक ठिकाणी सुरुवात केली आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती त्यांनी कपाशीची पूर्वहंगामी लागवड केली आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी शहरात जाताना मास्क किंवा रुमाल बांधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...