आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थायी समितीच्या सभेत सभापती आदेश देतात. पण प्रश्न सुटत नाही. सभापतींच्या आदेशांना अधिकारी, कर्मचारी केराची टोपली दाखवतात मग आदेश देऊन उपयोग काय असा प्रश्न भाजपचे नगरसेवक नागसेन बोरसे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला. तसेच याविषयीचे बॅनरही सभेत झळकवले. महापालिका सभागृहात गुरुवारी झालेल्या सभेला सभापती शीतल नवले, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. नगरसेवक हर्षकुमार रेलन म्हणाले की, प्रभागात काम होत नाही. विकास कामांची फाईल हरवल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांना नोटीस देण्याची सूचना झाली होती. नगरसेवक नागसेन बोरसे म्हणाले की, सभापती अनेक सूचना करतात. पण प्रशासन सूचनांची अंमलबजावणी करत नाही. तोच विषय पुन्हा मांडावा लागतो. एलबीटी तपासणी, आस्था संस्थेचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. प्रशासन माहिती देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक रेलन यांनी एलबीटीकडे लक्ष वेधले. आयुक्त टेकाळे यांनी शुक्रवारी एलबीटी विभागाची बैठक होणार असल्याचे सांगितले. नगरसेवक साबीर खान यांनी निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली.
आयुक्त कार्यालयात भेटत नाही करायचे तरी काय
आयुक्तांकडे महत्त्वाचे विभाग आहे. त्यामुळे त्यांना नगरसेवक भेटतात पण अनेकवेळा आयुक्त कार्यालयात गेल्यावर भेटत नाही, हा प्रकार नेहमी होत असल्याची तक्रार नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली. नगरसेवक साबीर खान यांनीही आयुक्त भेटत नाही, त्यांनी भेटण्यासाठी वेळ निश्चित करावी, अशी सूचना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.