आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजासह अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आता ड्रोनची मदत:विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांची माहिती

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हेगार गुन्हे घडवण्यासाठी अत्याधुनिक तंत्र वापरतात. त्यामुळे आता पोलिसांना त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे राहावे लागेल. ही बाब लक्षात घेत गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार होते आहे. त्यात गुन्हेगारांची संपूर्ण माहिती असेल. त्यामुळे गुन्ह्याची कमी वेळात उकल होईल. गांजासह अन्य मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलिस उप-महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी सांगितले की, नवापूर येथील लॉकअपमधून पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील लाॅकअप रूमची माहिती घेतली. पोलिस ठाणे व वसाहतींचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयात साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार गुजरात पाेलिसांना हवे असलेले आरोपी धुळे पोलिसांनी त्यांच्या स्वाधीन केले आहे. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी विशेष साॅफ्टवेअर विकसित केले जाते आहे. सीमावर्ती भागात गांजा व मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कारवाई होते आहे. लवकरच काही पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात तक्रारदार व साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार धुळयात वाढले असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...