आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर कामाला झाली सुरुवात‎:जंबो आयसीयूच्या कामास वेग‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रस्तावित‎ असलेल्या जंबो आयसीयू बद्दल ‘दिव्य‎ मराठी’ने वृत्त दिल्यानंतर कामाल सुरुवात‎ झाली आहे. महिना भरात काम पूर्ण होऊ‎ शकेल, असा विश्वास वर्तवण्यात येतो आहे.‎ काेरोना काळात सन २०२० मध्ये जिल्हा‎ रुग्णालयाच्या आयसीयू साठी निधी मंजूर‎ करण्यात आला होता. सुमारे ४ कोटी‎ रुपयांचा हा निधी देत शासनाने काम मार्गी‎ लावण्याचे आदेश दिले होते.

त्यातून ३०‎ बालरुग्णासाठी तर व ४० ज्येष्ठांसाठी असे‎ एकूण ७० आयसीयू उभारण्यात येणार होते.‎ त्याकरिता आवश्यक साहित्य देखील‎ शासनाने पाठवले. अपघात विभागाच्या वर‎ हा आयसीयू कक्ष प्रस्तावित आहे; परंतु‎‎‎‎‎‎‎‎‎ साहित्य मात्र धूळखात पडून आहे.

या‎ कामासाठी डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत दिली‎ होती. मात्र डिसेंबरच काय तर जानेवारी २०२३‎ येऊनही काम झाले नाही.याबाबत दिलेल्या‎ वृत्ताची दखल घेऊन या कक्षामध्ये सध्या‎ इलेक्ट्रिक फिटिंग तसेच छताचे काम केले‎ जाते आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या १५‎ तारखे पर्यंत सर्व साहित्य या कक्षात येईल,‎ असा विश्वास वर्तविला जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...