आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:तळोद्यात 30 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सेवाभावे प्रतिष्ठान, कृपासिंधू सेवाभावी संस्था व कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात अाले. या शिबिरात ३० दात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष अजय परदेशी अध्यक्ष म्हणून तर आमदार राजेश पाडवी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी, तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, कलाल समाज अध्यक्ष संजू कलाल, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप माळी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. मान्यवरांच्या हस्ते प्रथम भारत माता पूजन झाले.

सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. या शिबिरामध्ये एकूण ३० दात्यांनी रक्तदान केले. महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी रक्तदान केलेल्या दात्यांना भेटवस्तू म्हणून घड्याळ व प्रशस्तिपत्रक देण्यात आले. कार्यक्रमासाठी तळोदा कलाल समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र कलाल, मनीष कलाल, दिलीप गिरनार, मनोज खैरनार, चेतन इंगळे, वासुदेव कलाल, कृपा सिंधू संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र कलाल, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश सोनवणे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...