आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा९ ऑगस्ट राेजी साजरा हाेणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाचे आैचित्य साधून समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आयाेजित रक्तदान शिबिरात ८८ दात्यांनी रक्तदान केले. शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कै.प्रताप केशव पाटील चर्चासत्र भवनात हे शिबिर उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात याहामोगी माता, खाज्या नाईक, बिरसा मुंडा, जननायक तंट्या भील, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष गिरीश गावित, माजी जि.प अध्यक्ष रजनी नाईक, गटनेता आशिष मावची, डॉ.नचिकेत नाईक, आर.सी. गावित, तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, उमराण ग्रामविकास संस्थेचे सचिव दीपक वसावे, डॉ.विशाल वळवी, प्राचार्य ए.जी. जयस्वाल, डॉ.शांतीभाई चौधरी, प्रा.डॉ. दीपक जयस्वाल, किरण वळवी, अतुल गावित आदी मान्यवर उपस्थित हाेते.
मान्यवरांच्या स्वागतानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. सर्वप्रथम रक्तदान उत्सव समितीचे अध्यक्ष गावित, सहायक पोलिस निरीक्षक वाघ, अमिर वसावे, अजय वसावे, संदीप गावित, विनोद देसाई, शैलेंद्र वसावे यांनी रक्तदान केले. शिबिरात संकलित रक्त जनक हॉस्पिटल संचलित श्रीमती लक्ष्मीबेन पटेल रक्तपेढी, व्यारा येथे पाठवण्यात येणार आहे.
यावेळी डॉ.नाईक म्हणाले की, रक्तदान केल्यामुळे आपण कोणाला जीवदान देऊ शकतो. हे फार पुण्याचे काम आहे. सूत्रसंचालन फास्टर बालूभाई गावित यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विनेश वसावे, लाजरस गावित, अतुल गावित, किरण वळवी, तेजस वसावे, मनोहर गावित, हर्षल गावित, अतुल ठिगळे, संदीप गावित, प्रवीण गावित, सतीश गावित या आदिवासी समाज कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.