आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या लपंडाव:तुरळक पाऊस; अडीच तास वीज गुल, 6.45 वाजता पुरवठा सुरू

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजेच्या लपंडावाबाबत नेहमीची ओरड आहे. त्यात देखील पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते. बुधवारी शहरात दुपारी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या चार थेंब पावसाच्या झाल्यानंतर तातडीने वीजपुरवठा खंडित झाला. वीज कंपनीच्या यंत्रणच्या अडीच तासाच्या धडपडी नंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या तुरळक प्रमाणात पाऊस झाला. साधे अंगण देखील ओले झाले नाही. मात्र पावसाच्या चार थेंबा नंतर लागलीच वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज कंपनीच्या यंत्रणेकडून तातडीने तांत्रिक बिघाडाचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

पारोळा रोडवर एका ठिकाणी तारांच्या घर्षण झाल्याने फॉल्ट झाल्यामुळे लालबाग सबस्टेशनसह पॉवर हाऊस, पारोळा रोड सबस्टेशन, राजवाडे सबस्टेशनच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहरातील मुख्यबाजारपेठ परिसर, शासकीय कार्यालयांच्या परिसरात साधारण अडीच तासांपर्यंत बत्ती गुल राहिली. फॉल्ट शोधला.

पारोळा रोडवर पुन्हा तारांची घर्षण होऊन तार तुटण्याची संभावना लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम उशीरा पर्यंत चालले अखेर अडिच तासाच्या परिश्रमा नंतर वीज कंपनीच्या यंत्रणेला अडीच तासा नंतर शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बातम्या आणखी आहेत...