आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन बसची‎ प्रतिक्षा‎‎:कुबेरधाम तीर्थक्षेत्रासाठी एसटी‎‎ महामंडळ सोडणार स्वतंत्र बस‎

धुळे‎‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत एसटीच्या धुळे विभागाने राज्यात‎‎ सर्वाधिक उत्पन्न मिळवले. तसेच धुळे‎‎ विभागात धुळे आगार आघाडीवर होता.‎‎ दुसरीकडे आगाराला बसची टंचाई जाणवते‎‎ आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या ३०‎ इलेक्ट्रानिक्स‎ बस मिळणे आवश्यक आहे.‎ दरम्यान, धुळे‎ आगारातून आता प्रत्येक‎ अमावस्येला कुबेर‎ धामसाठी स्वतंत्र बस‎ सोडण्यात येणार आहे.‎‎ एसटी महामंडळाच्या धुळे विभागाने‎‎ उन्हाळ्याच्या सुट्टीत जादा उत्पन्न मिळावे‎‎ यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. मार्च ते जुन‎‎ दरम्यान लांब पल्याच्या बस सोडण्यात येणार‎‎ आहे.

शहरासह जिल्ह्यातून अमावस्येला‎‎ कुबेरधामला जाणाऱ्या भाविकांची संख्या‎‎‎‎‎‎‎‎ जास्त आहे. त्यामुळे धुळे आगारातून थेट‎‎ कुबेरधामला जाण्यासाठी येत्या‎‎ अमावस्येपासून बस सोडली जाणार आहे.‎‎ काही महिन्यापासून धुळे आगाराला‎ बसची‎ कमतरता जाणवते आहे. धुळे‎आगाराकडे १२१‎ बस उपलब्ध आहे. मागील‎ वर्षाच्या तुलनेत‎ ५५ बस बाद झाल्या. काही बस‎ स्क्रॅपमध्ये‎ गेल्या तर काही नादुरुस्त आहे.‎ एसटीच्या‎ मुंबई प्रादेशिक कार्यालयाने धुळे‎ विभागाला‎ १०० इलेक्ट्रॉनिक बस देण्याची‎ घोषणा केली‎ आहे. पण त्या मिळाल्या नाहीत.‎

नवीन मार्गावर बस‎
उत्पन्न वाढीच्या दृष्टीने नवीन मार्गावर‎ बस‎ सोडण्याचे नियोजन आहे. आगामी‎ काळात‎ कुबेरधामला दर अमावस्येला बस‎ ‎धावेल.‎ - स्वाती पाटील, आगार व्यवस्थापक, धुळे‎‎

बातम्या आणखी आहेत...