आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुट्या अन् अक्षय्य तृतीया सणामुळे एसटी फुल्ल; संपानंतर चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया आणि सलग सुट्यांमुळे गेल्या काही दिवसात एसटीला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लांब पल्याच्या बसेस फुल्ल आहेत. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी मात्र नागरीक प्रवास टाळत असल्यामुळे दुपारी बसस्थानकांवर शुकशुकाट जाणवत आहे. दरम्यान संपानंतर पहिलाच सण असल्यामुळे एसटीला या गर्दीतून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

शाळांना सुट्या लागल्या आहेत.तसेच अक्षय तृतीयाचा सणामुळे गावाकडे जाणाऱ्यांची देखील गर्दी आहे. त्यामुळे शनिवारपासून बसस्थानकात गर्दी होत आहे. सोमवार थोड्याफार प्रमाणात गर्दी कमी झाली होती. मात्र मंगळवारी, बुधवारी सकाळी बसस्थानकात प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र दुपारी १२ वाजे नंतर उन्हाचा तडाखा वाढल्या नंतर दुपारी आगारात प्रचंड शांतता होती. मोठ्या कालावधी नंतर एसटीची नियमीत सेवा सुरु झाल्यामुळे प्रवाश्यांची देखील पहिली पसंत एसटीलाच आहे.

या मार्गावर सर्वाधिक गर्दी-
नाशिक, जळगाव, साक्री, शिरपूर, चोपडा, पारोळा, चाळीसगाव, नंदुरबार या मार्गावर सर्वाधिक गर्दी आहे. या शिवाय औरंगाबाद, सुरत आणि वापीकडे जाणाऱ्यांची देखील गर्दी आहे. या गर्दीचा विचार करत या मार्गावर प्रत्येक अर्धा आणि एक तासांनी बसस सोडण्यात येत आहे. नाशिक मार्गावर विना वाहक बससेवे बरोबरच वाहकासह देखील बसेस आहेत.

बातम्या आणखी आहेत...