आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा:ज्येष्ठ नागरिकांना एसटीने स्मार्टकार्ड द्यावे

शिंदखेडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळातर्फे काही दिवसांपासून स्मार्टकार्ड उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. स्मार्ट कार्ड प्रिंट करणारे मशीन नादुरुस्त झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाने ही समस्या सोडवून ज्येष्ठांना स्मार्टकार्ड द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

एसटी महामंडळाच्या येथील डेपोत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्यासाठी स्वतंत्र मशीन घेण्यात आले आहे. काही दिवसांपासून हे मशीन नादुरुस्त असल्याने नागरिकांना कार्ड मिळत नसल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे स्मार्ट कार्ड १ जुलैपासून बंधनकारक आहे. त्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर स्मार्टकार्ड दिले जात नाही. तसेच विद्यार्थ्यांना मासिक पास देण्यासाठी केवळ एकच कर्मचारी आहे. तोच कर्मचारी स्मार्टकार्ड वाटपाचे काम करत असतो. एकाच व्यक्तीवर दोन कामे सोपवल्याने अडचणी निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडवावा. तसेच स्मार्टकार्ड अंमलबजावणीची मुदत वाढावी, मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे स्वप्निल मोरे, यादव, मयुर सोनार, हाजी जलाल शेख आदींनी दिला आहे.