आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडगा काढण्याचे आश्वासन:आश्वासनानंतर एसटीच्या प्रशिक्षणार्थींचे उपोषण मागे

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने २०१९मध्ये चालकांची भरती करण्यात आली. या चालकांना प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र आजपर्यंत प्रशिक्षित चालकांना नियुक्तीच देण्यात आलेली नाही. दुसरीकडे कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. या कंत्राटी चालकांची नियुक्ती रद्द करून प्रशिक्षण झालेल्या तरुणांना संधी देण्यात यावी. या मागणीसाठी तीन दिवसांपासून तरुणांनी उपोषण सुरू केले होते. यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर बुधवारी उपोषण मागे घेण्यात आले.

बुधवारी जिल्हा परिषदेचे कृ़षी सभापती संग्राम पाटील, सदस्य वीरेंद्र गिरासे, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख मनोज मोरे, संजय वाल्हे यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. तसेच मागणीबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या वेळी विभाग नियंत्रकांनी देखील सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...