आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:स्थायी समितीला पाचच सदस्य; 36 विषय मंजूर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस व विवाह तिथीमुळे जिल्हा परिषदेत शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह दोन सभापती व एक सदस्य उपस्थित होते. सभेत अनामत रक्कम परत करण्याचे ३५ विषय मंजुर झाले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा अश्विनी पवार-जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वेळी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण व आरोग्य समिती सभापती महावीरसिंग रावल, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी यांनी विषय समितीचा आढावा घेतला. या वेळी केवळ तीन सदस्य हजर होते. सभेचा कोरम पूर्ण नसताना काम सुरू झाले.

काही वेळाने महा विकास आघाडीचे पोपटराव सोनवणे आले. त्यानंतर समाज कल्याण सभापती कैलास पावरा आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन सभापती आणि एक सदस्य अशा पाच सदस्यांच्या उपस्थितीत सभा झाली. सभेत दहिवद तांडा रस्त्याच्या कामाची ६० लाखांची निविदा मंजुर झाली. विषय पत्रिकेवरील आठ विषयांसह अन्य विषय मंजुर झाले. आयत्या वेळेच्या विषयात अनामत रक्कम परत करण्याचे ३५ विषय होते. ते सर्व मंजुर झाले.

बातम्या आणखी आहेत...