आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अक्कलकुवा येथे आदिवासी मुलांसाठी वसतिगृहे सुरू करा ; जिल्हाप्रमुख आमश्या पाडवींची मागणी

अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तालुक्यात खापर, वाण्याविहीर, मोलगी व अक्कलकुवा या ठिकाणी १९७७ पासून ७५ मुलांच्या क्षमतेचे वसतिगृह आहे. तळोदा येथे मुलांचे तीन व मुलींचे दोन वसतिगृह कार्यान्वित आहेत. तेथे फक्त कला, विज्ञान, वाणिज्य व समाजकार्य महाविद्यालये आहेत. तर अक्कलकुवा येथे विविध पदविका, अभियांत्रिकी, विधी, औषधनिर्माणशास्त्र, दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालये. दोन डीएड तसेच कला, विज्ञान, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालये व ४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. शैक्षणिक सुविधेमुळे मोठ्या संख्येने मुले-मुली येथे प्रवेश घेतात. मात्र वसतिगृहाची क्षमता तोकडी असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना ताणतणावास सामोरे जावे लागते. तसेच निवास व भोजन व्यवस्था नसल्याने मध्येच शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे स्वतंत्र १२५ विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह तत्काळ मंजूर करून या मुला-मुलींना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख पाडवी यांनी केली. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रवींद्र गुरव, युवासेनेचे जिल्हा अधिकारी ललित जाट, तालुकाप्रमुख मगन वसावे, उपप्रमुख तुकाराम वळवी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...