आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा सुरू करण्याची मागणी:खुंटामोडी मार्गे कात्री मुक्कामी बस सुरू करा

धडगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अककलकुवा आगारातून अक्कलकुवा खुंटा मोडी मार्गे कात्री येथे मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संदीप मोहन वळवी यांनी केली.

धडगाव तालुक्यातील कात्री गावासह परिसरातील पाठील पाडा, शेल्टी पाडा, गुंडा पाडा, कामोद पाडा, तोरखा पाडा, केलवाणी पाडा, आमली पाडा, कौलीमाल पाडा, हाणी पाडा, पौटी पाडा, सेगीलीबार पाडा, मोजा पाडा, कात्री फाॅरेस्ट, वाहवाणी, नलदा, पोहला, माकडकुंड, उबीला,खडक्या, सोन, पिपळचौक या गाव पाड्यांवरील नागरिक, विद्यार्थ्यांना कात्री मुक्कामी बससेवा सुरू झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीची होणार आहे. कात्री येथून सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान बससेवा सुरू करा, अशी मागणी धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप वळवी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...