आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पालिकेंतर्गत आरोग्यवर्धिनी सेवा सुरू करा; आत्मनिर्भर भारत अभियानातर्फे आयुक्तांकडे केली मागणी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने नागरिकांना आरोग्याच्या सुविधा व त्वरित उपचार मिळावेत यासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत महापालिका अधीन १६ आरोग्यवर्धिनी व २ पॉलिक्लिनिक सुरू करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. मात्र महापालिकेकडून आरोग्यवर्धिनी सुरू होण्यास विलंब होत आहे. त्याकरता महापालिका प्रशासनाने आवश्यक ती पूर्तता करून सुरू करावी, अशी मागणी आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे आत्मनिर्भर भारत अभियान जिल्हा संयोजक व भाजप महानगर उपाध्यक्ष सचिन शेवतकर यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

महापालिका आयुक्त देविदास टेकाळे यांना सोमवारी सचिन शेवतकर यांनी दिलेल्या निवेदनात दिले आहे की, १५ व्या वित्त आयोगांतर्गत महापालिका अधीनस्त १६ आरोग्यवर्धिनी व २ पॉलिक्लिनिक सुरू करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. आरोग्यवर्धिनीकरीता महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आली आहे; परंतु पालिकेकडून अद्यापपर्यंत आरोग्यवर्धिनीकरिता एनओसी प्राप्त झालेली नाही. नगररचना विभागाकडून भाडेनिश्चितीकरिता दिलेली फाइल अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. प्रशासकीय स्तरावर भाडे निश्चित करून संबंधित विभागाला एनओसी द्यावी व मनपा अधिनस्त आरोग्यवर्धिनी सुरू करावी, असे निवेदन दिले आहे. निवेदन खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरीश पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, विजय पाच्छापूरकर, हर्षल विभांडिक, सभापती शीतल नवले, नगरसेवक हिरामण गवळी, नागसेन बोरसे, कल्याणी अंपळकर, भगवान गवळी, सुनील बैसाणे, किरण अहिरराव, गजेंद्र अपंळकर आदींच्या मार्गदर्शनाखाली दिले.

बातम्या आणखी आहेत...