आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सुरत-भुसावळ पॅसेंजर तत्काळ सुरू करा : सिसोदे

सोनगीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात बंद झालेली सुरत- भुसावळ पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू होणे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी भाजपा महिला तालुकाध्यक्षा माधुरी मधुकर सिसोदे यांनी माजी मंत्री रावल व खासदार भामरे,भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील व रेल्वे विभागाला दिले आहे.

सुरत- भुसावळ पॅसेंजर रेल्वेसेवा बंद असल्याने नरडाणासह होळ, बेटावद यांसारख्या अनेक थांब्यावर जलद गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नरडाणा हे औद्योगिक वसाहत व राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे स्थानक असल्याने परिसरासह सुरत- भुसावळ पॅसेंजर सेवा सुरू होणे गरजेचे असून वरिष्ठ स्तरावरून यासाठी प्रयत्नशील असून लवकर ही रेल्वेसेवा सुरू करावी, अशा आशयाचे निवेदन सिसोदे यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...