आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:राज्य महिला आयोग‎ सदस्या आज जिल्ह्यात‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎राज्य महिला आयोगाच्या सदस्या‎ दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते‎ सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर‎ येणार आहेत. त्या धुळे व साक्री‎ तालुक्यात भेट देणार आहेत.‎ दरम्यान सकाळी ११ वाजेला‎ महिलांच्या तक्रारी, अडचणी‎ विषयक प्रकरणांचा आढावा घेणार‎ आहेत.

याच बरोबरच महिलांच्या‎ सुरक्षिततेशी निगडित असलेले‎ विषय, आयसी कमिटी, दक्षता‎ समिती, वात्सल्य समिती,‎ शासनाच्या महिला आणि‎ बालकल्याणशी निगडित असलेल्या‎ विविध योजनांचा आढावा,‎ बालविवाह संदर्भातील आढावा‎ घेणार आहेत. याच बरोबर महिला‎ व मुलींसाठी असलेले शासकीय‎ वसतिगृह, उपजिल्हा रुग्णालय,‎ आश्रम शाळांचा आढाव घेतील.‎

बातम्या आणखी आहेत...