आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:स्टेटसने अक्कलकुव्यात शांतता भंग; रात्री दगडफेक

अक्कलकुवा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आक्षेपार्ह व्हॉट‌्सअॅप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून अक्कलकुवा शहरात शुक्रवारी मध्यरात्री एका गटाने तुफान दगडफेक केली व अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड व काही वाहनांची जाळपोळही केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. शनिवारी तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी २४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.m नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी भीती न बाळगता शांतता ठेवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.

संशयित आरोपींची धरपकड
पोलिस अधीक्षक पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले. मोठा फौजफाटा तैनात करून वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.'

अशी घडली घटना
नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी काही जणांनी निषेध नोंदवत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर रात्री उशिराने मोठ्या जमावाने पोलिस स्टेशनला येऊन व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवणाऱ्या युवकावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याची मागणी केली. पोलिस व काही प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाची समजूत घालून जमावाला माघारी पाठवले. पोलिस स्टेशनमधून परतत असताना जमावाने शहरातील झेंडा चौक, बाजारपेठ, तळोदा नाका, मरीमाता मंदिर परिसरात दुचाकी व चारचाकी व घरांवर दगडफेक केली.

पोलिस वाहनावरही दगडफेक
लाठ्या काठ्या, लोखंडी पाइप, दगड यांच्या साहाय्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड केली. त्यामुळे रात्री अक्कलकुवा शहरात घबराट व तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी रस्त्यावर येत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवरही दगडफेकल्याने काच फुटली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळ कांड्या फोडल्याचे वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...