आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतील बैठकीत विक्रेत्यांना सूचना:प्लास्टिकच्या पिशवीत दूध विक्री करणार बंद

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध विक्रेत्यांनी नागरिकांना प्लास्टिकच्या पिशवीत दूध देऊ नये, अशी सूचना व्यावसायिकांना महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत ही बैठक झाली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, नगरसेवक हर्ष रेलन उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शहरात करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये.

ग्राहकांना प्लास्टिकची पिशवी न देता कापडी पिशवी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. उपायुक्त विजय सनेर म्हणाले की, दूध डेअरी चालकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करना ग्राहकांना दूध घेण्यासाठी भांडे आणण्यासाठी प्रवृत्त करावे, अशी सूचना त्यांनी केली.

नगरसेवक हर्ष रेलन म्हणाले की, व्यापाऱ्यांनी कायद्याचे पालन करावे. कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असेही ते म्हणाले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याचे आश्वासन व्यावसायिकांनी दिले. मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...