आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथील जात पडताळणी विभागातील सहायक आयुक्त दिनकर पावरा यांची राजकीय दबाव तंत्राचा वापर करून अन्यायकारक बदली केल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आदिवासी विविध संघटनांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची ५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता शहादा येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या सात एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांत तहसीलदारांना निवेदन देण्याच्या निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीला आदिवासी एकता परिषदेचे नेते वाहरू सोनवणे, पावरा बारेला समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव पटले, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता झेलसिंग पावरा, सुरेश मोरे, संतोष पवार, संजय पावरा, प्रा.अशोक वळवींसह विविध आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनकर पावरा हे औरंगाबाद येथे चार वर्षांपासून जात पडताळणी विभागात उपसंचालक होते. गेल्या आठ ते दहा महिन्यांपूर्वी त्यांना त्याच विभागात सहायक आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.
मात्र मार्च महिन्यात बदली करता येत नसताना देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने प्रशासकीय बदली केली जी अन्यायकारक आहे. त्यांची बदली रद्द करण्यासाठी अथवा त्यांना खरा न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली जाणार आहेत. १३ एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना हजारो आदिवासी बांधव निवेदन देतील. याव्यतिरिक्त राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात येणार आहे. आदिवासी आमदार, खासदार, मंत्री यांनादेखील यासंदर्भात जाब विचारला जाणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.