आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बँकेची सेवा सुरळीत करा;  भाजप किसान मोर्चाने केली मागणी

खेडदिगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील म्हसावद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून तिची सेवा सुरळीत मिळत नसल्याने भाजप किसन मोर्चाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष कपिल जयस्वाल यांनी सेवा सुरळीत देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

डिजिटल इंडियाची सुरुवात झाली आहे. सेंट्रल बँकेच्या म्हसावद शाखेंतर्गत येत असलेल्या सर्व्हिस सेंटरवर पैसे निघत नाहीत. त्या उलट इतर खासगी बँकेतून निघतात. केवायसी करून किंवा आधार अपडेट करूनही अंगठा उमटत नाही व अंगठा जुळत नाही, असा संदेश येतो. परिणामी पैसे निघत नाहीत, नागरिकांकडून एटीएम कार्डची मागणी होऊन ही ते मिळत नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...