आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Streetlights In Songir Shut Down Due To Electricity Bill Exhaustion; The Power Company Should Restore Power Supply To The Streetlights, Otherwise Agitation |marathi News

इशारा:सोनगीरमधील पथदिवे वीजबिल थकल्याने बंद; वीज कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा आंदोलन

सोनगीर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे वीजबिल थकवल्याने वीज कंपनीने गावातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून सर्व पथदिवे बंद आहेत. वीज कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

सोनगीर हे बाजारपेठेचे गाव असून, ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे सुमारे दीड कोटी रुपये वीजबिल थकवले आहे. त्यामुळे वीज कंपनीने ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने वीजबिलाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होते आहे. दुसरीकडे वीज कंपनीने याविषयावर सामंजस्याने तोडगा काढून पथदिवे सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य विशाल कासार, माजी प्रभारी सरपंच केदारेश्वर मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, समाधान पाटील, हाजी अल्ताफ कुरेशी आदींनी दिला आहे.

थकबाकी त्वरित भरावी
ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे वीजबिल न भरल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशानुसार वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे. थकबाकी भरणा करून सहकार्य करावे.
हेमंत अहिरे, सहायक अभियंता

बातम्या आणखी आहेत...