आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय टाळली:हिरे त 116 डाॅक्टरांचा संप; अपघात, अतिदक्षता विभागामध्ये सेवा सुरळीत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत मोडकळीस आलेल्या वसतिगृहांचे काम करावे, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदांची निर्मिती करून ती भरावी, महागाई भत्ता द्यावा, वेतनातील तफावत दूर करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना अर्थात मार्डतर्फे सोमवारी संप झाला. या आंदोलनात शहरातील हिरे रुग्णालयातील ११६ डॉक्टर सहभागी झाले. पण अपघात, प्रसूती व अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी सेवा देत रुग्णांची गैरसोय टाळली.

डॉक्टरांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मान्य झाल्या नाही त्यामुळे निवासी डॉक्टरांनी सोमवारी आंदोलन केले. घोषणाबाजी करत लक्ष वेधले. आंदोलनात मार्डचे महासचिव डॉ. पवन मुंडे, अध्यक्ष डॉ. कीर्तिका कुंतल, डॉ. दीपेश पटेल, डॉ. श्रुती भोगले आदी सहभागी झाले. दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अपघात, प्रसूती विभाग, अतिदक्षता आदी आपत्कालनीन विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते.

शासनाने निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र
शासनाने मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर वेळ प्रसंगी निवासी डॉक्टर आपत्कालीन कक्षात सेवा देणे बंद करू शकतात. आंदोलनाची पुढील दिशा वरिष्ठांच्या निर्देशानुसार ठरवण्यात येईल.-डॉ. पवन मुंडे, महासचिव, मार्ड

बातम्या आणखी आहेत...