आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या विरोधात त्यांच्याच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. अभियंता वर्षा घुगरी अरेरावी करतात. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत विभागीय चौकशी करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वर्षा घुगरी यांच्या विरोधात समस्यांचा पाढा वाचला. कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी मनमानी पद्धतीने वागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणालीचा दुरुपयोग करतात. त्यांच्या आदेशानुसार कार्यालयात जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार खुले आहे. त्यामुळे दिव्यांग व महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होते.
तसेच त्या उपअभियंता, सहायक अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आदींना अरेरावी करतात. गोपनीय अहवालात चुकीची नांेद करण्याची धमकी देतात. त्यामुळे त्यांची चौकशी करावी, पाच दिवसांत निर्णय झाला नाही तर काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डी. बी. झाल्टे, डी. पी. इसे, डी. बी. हिरे, के.एन. पाटील, व्ही. ए. वाघ, वाय. एफ. कुवर, यू. आर. पवार, एम. ए. गर्दे, आर. जी. पाटील आदींनी दिला आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा आहे अधिकार
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. काही कर्मचाऱ्यांनी उपअभियंत्याच्या दबावाखाली येत तक्रार केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय सुरक्षेसाठी घेतली आहे. कोणतेही विकास काम थांबवलेले नाही.-वर्षा घुगरी, कार्यकारी अभियंता, बांधकाम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.