आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येथे छात्र नेता विद्यार्थी संमेलन झाले. संमेलनात परिषदेच्या शहरमंत्रिपदी हंसराज चौधरी याची निवड झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या प्रदेश मंत्री अंकिता पवार, सहकार भारतीचे क्षेत्रीय संघटन मंत्री दिलीप लोहार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख प्रा. अमोल मराठे उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेला ९ जुलैला ७४ वर्षे पूर्ण झाले. परिषदेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले असून आगामी काळतही अनेक उपक्रम हाेतील, असे सांगण्यात आले. या वेळी सन २०२१-२२ मध्ये शिरपूर शाखेतर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती हंसराज चौधरी यांनी दिला. प्रदेश मंत्री अंकिता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी परिषद शिरपूर शहर कार्यकारिणीची निवड झाली. त्यानूसार तालुका संयोजकपदी सुमित गिरासे, शहर सहमंत्रिपदी हिमानी पाटील, पुष्पक जैन, पार्थ राजपूत, मिडीया प्रमुखपदी सागर भामरे, अभ्यास मंडळ प्रमुखपदी देवेंद्र पाटील, कलामंच संयोजकपदी शीतल पाटील, सहसंयोजकपदी मोनाली वाघ, तंत्रशिक्षा विद्यार्थी कार्य प्रमुखपदी गौरव भोई, स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट संयोजकपदी संकेत पाटील, स्टुडंट फॉर सेवा संयोजकपदी मीनल पाटील यांची निवड करण्यात आली. संकेत पाटील याने सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.