आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिमापूजन:शहादा येथे वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी केले अध्यापनाचे काम

शहादा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य केले. सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

या वेळी प्राचार्य महेंद्र मोरे, उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, उपमुख्याध्यापक जे. एम. पाटील, पर्यवेक्षक अनिल खेडकर, संजय बोरसे उपस्थित होते. ६५ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षकांची भूमिका पार पाडली. त्यांनी दिवसभर शालेय कामकाज सांभाळले. प्राचार्य म्हणून विद्यार्थिनी कोमल सोनवणे, उपप्राचार्य म्हणून लोकेश खैरनार यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थी सागर माळी, उपमुख्याध्यापक म्हणून श्रीराज ओगले यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...