आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:विद्यार्थी गाजवताय अश्व मैदान ; इंदूर, लोणी, शिरपुरातील 60 विद्यार्थ्यांचा सहभाग

सारंगखेडा / रणजित राजपूतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अश्व खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रोत्सवातील चेतक फेस्टिव्हलमध्ये यंदा डे- नाईट अश्व क्रीडा स्पर्धांचा चित्तथरारक अनुभव अश्वप्रेमी घेत आहेत. यात महाराष्ट्रातील नागपूर नवी मुंबई, लोणी, शिरपूर, नंदुरबार तर मध्य प्रदेशातील इंदूर येथील ८ ते १६ वर्ष वयोगटातील विद्यार्थी अश्व क्रीडा मैदान गाजवत आहेत.

देशभरात सारंगखेडा ता.शहादा येथील श्री एकमुखी दत्ताच्या जयंतीपासून भरणाऱ्या यात्रेला आता ग्लोबल मान्यता मिळाली आहे. मनोरंजनाच्या यात्रेपेक्षा घोडयांच्या बाजारासाठी ही यात्रा पूर्वीपासून प्रसिध्द आहे. यंदा या यात्रेत अन्य सर्व कार्यक्रम रद्द करून चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून केवळ घोड्यांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व घोडा विक्री यावरच लक्ष केंद्रीत केले आहे. यात्रेला यंदा प्रथमच अश्व क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असून प्रथमच या डे- नाइट स्पर्धा होत आहेत. चेतक फेस्टिव्हलचे आयोजक जयपालसिंह रावल यांनी अश्वप्रेमींसाठी विशेष सुविधा प्रदान केल्या आहेत. अश्व प्रेमींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी खास कार्यालय स्थापन केला आहे. याठिकाणी मोठया अदबीने तक्रारींचे निवारण केले जाते. राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील १८०० हून अधिक घोडे विक्रीसाठी आले आहेत.

अशा रंगताय स्पर्धा पाच खांब रोवून झिक झॅक पध्दतीने घोडयांनी पळणे, टेंट पॅकिंग अर्थात चालत्या घोडेस्वाराने भाल्याच्या सहाय्याने तंबू उखडून फेकणे, बॅरल अर्थात पाण्याच्या टाकींना स्पर्श न करता घोड्यांनी पळणे अशा या स्पर्धा आहेत. या स्पर्धेत घोडेस्वार म्हणून प्रवरानगर येथील व्ही के. पाटील सैनिकी शाळेचे शिक्षक दीपक धाकणे १४ विद्यार्थीसोबत आले.

तीन मैदानांवर रंगतेय अश्व स्पर्धा विशेष म्हणजे घोड्यांच्या क्रीडा स्पर्धेसाठी तीन मैदाने आहेत. तीन फूट खड्डा करून मऊ माती टाकली आहे. क्रीडा स्पर्धेत घोड्यांच्या पायांना इजा होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली गेली आहे. सरावासाठी २१० बाय १६० स्क्वेअर फूट जागेवर दुसरे मैदान आहे. बाजूला घोडयांना पळण्यासाठी वेगळे मैदान बनवण्यात आले आहे.

विशेषत: शिवरायांच्या युद्ध कलेतील प्रकार विद्यार्थी हे घोडयांवर स्वार होऊन घोड्यांच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असून या अनोख्या खेळांत या विद्यार्थ्यांत कमालीची आवड निर्माण असल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धात वापरले जायचे.,असे आयोजक जयपालसिंह रावल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...