आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:विद्यार्थ्यांनी शाळेत शिकवण्याचा अनुभव घेऊन शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता ; दिवसभर सांभाळले कामकाज

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. दिवसभर शाळेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळत शिस्तीचेही दर्शन त्यांच्याकडून घडवण्यात आले. तसेच शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पाेदार स्कूल : शहरातील पाेदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत शिक्षकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले. शाळेच्या व्यवस्थापनाने देखील शिक्षकांसाठी काही भेट म्हणून एक ऐतिहासिक सहलीचे आयोजन केले होते. त्यात सर्व शिक्षकांना सहलीचा छान आनंद मिळाला आणि एक अनुभूतीदेखील मिळाली. प्राचार्य भूषण उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली नववी आणि दहावीच्या वर्गशिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

डॉ. आंबेडकर विद्यालय देवपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कल्पना पावरा हिने मुख्याध्यापिका म्हणून शाळेचे कामकाज पाहिले तर अनिल पावरा, अर्चना पावरा, देविदास पाडवी या विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका निभावली. त्यानंतर शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे प्राचार्य एस.जी.सिसोदिया व शाळेचे पर्यवेक्षक आर. एन. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक आर. जी. देवरे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य एस. जी. सिसोदिया यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी. टी. वाडिले यांनी केले.

शिरपूर शहरातील आर.सी. पटेल शाळेत शिक्षक दिन
शिरपूर शहरातील आर.सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील इयत्ता चौथी वर्गातील ६५ विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका केली. या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून गौरवण्यात आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भूमिका रितूल पवार व रितेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी केली. तर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत आदित्य ठाकूर या विद्यार्थ्याने काम पाहिले. सातवी वर्गातील राहुल बडगुजर याने बालविज्ञान परिषदेत सहभाग घेतला होता. त्याला या स्पर्धेत प्रमाणपत्र मिळाले होते. मुख्याध्यापक सी.डी.पाटील, सुशीला मराठे, पालक प्रतिनिधी कोंडिबा गायकवाड उपस्थित होते.प्रास्ताविक गजेंद्र जाधव यांनी तर सूत्रसंचालन विवेकानंद ठाकरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...