आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या परीक्षेत तालुक्यातील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
सावित्रीबाई रंधे विद्यालय
शिरपूर येथील सावित्रीताई रंधे कन्या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक धनश्री सूर्यवंशी ९३.२० टक्के, द्वितीय क्रमांक वर्षा वसेशव व पूर्वी मराठे ९३ टक्के, तृतीय क्रमांक कल्याणी कोकणी ९२.८० टक्के यांनी मिळवला.
ब. ना. कुंभार गुरूजी शाळा
वाघाडी येथील ब. ना. कुंभार गुरुजी विद्यालयाचा ९८ टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक जयेश सोनवणे ८८ टक्के, द्वितीय हर्षा देशमुख ८७.८० टक्के, तृतीय क्रमांक वैशाली शिरसाठ ८७.४० टक्के यांनी मिळवला.
रमाबाई आंबेडकर शाळा
अर्थे येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक विद्यालयचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक कीर्ती बडगुजर ९३ टक्के, द्वितीय साक्षी पटेल ९२.६० टक्के, तृतीय क्रमांक करिश्मा चौधरी ९२.४० टक्के यांनी मिळवला.
खंडेलवाल विद्यालय
होळनांथे येथील रामेश्वर रामरतन खंडेलवाल विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक रोहित सपकाळे ८६.६० टक्के, द्वितीय विकास पावरा ८५ टक्के, तृतीय क्रमांक कोमल भोई ८४.८० टक्के यांनी मिळवला.
फुले माधमिक विद्यालय
शिरपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयचा निकाल ८८.४० टक्के लागला. प्रथम क्रमांक गोविंद कोळी ८९.०४ टक्के, द्वितीय रोहित निकम ८९.०२, तृतीय क्रमांक आकाश तडवी ८८.०८ टक्के यांनी मिळवला.
मौलाना कमाल शाळा
शिरपूर येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्रमांक लुबना खाटीक ८७ टक्के, द्वितीय नमीश युनुस ८५.५०, तृतीय क्रमांक आयशा कुरेशी ८४.८० टक्के यांनी मिळवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.